अधीक्षकांचा एक निर्णय, 12 पोलीस निलंबित!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

सलीम शेख, टीव्ही 9 मराठी, परभणी: परभणी पोलिसातील बेशिस्त 12 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ही कारवाई केली. शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन असे आरोप या पोलिसांवर ठेवण्यात आले आहेत. परभणी पोलीस दलातील हे 12 पोलीस कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून सतत गैरहजर राहात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही […]

अधीक्षकांचा एक निर्णय, 12 पोलीस निलंबित!
Follow us on

सलीम शेख, टीव्ही 9 मराठी, परभणी: परभणी पोलिसातील बेशिस्त 12 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ही कारवाई केली. शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन असे आरोप या पोलिसांवर ठेवण्यात आले आहेत.

परभणी पोलीस दलातील हे 12 पोलीस कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून सतत गैरहजर राहात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे कर्मचारी दांड्या मारत होते. काही कर्मचारी बेशिस्त वर्तणूक करत होते. त्यांना समज देणात आली असली, तरी त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नसल्याने, पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कारभारी वाघमारे, राजेश वाजपेयी, श्रीधर खोकले, गजानन पाटील, व्यंकट बिलापट्टे, विजय उफाडे (सर्व पोलीस मुख्यालय, परभणी), निहाल अहमद नूर पटेल, सुरेश पानपट्टे (जिंतूर पोलीस ठाणे), संतोष जोंधळे (पाथरी पोलिस ठाणे), संतोष जाधव, सुरेश मोरे (नानल पेठ पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.