बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीकडून फिटनेसचं सिक्रेट शेअर

| Updated on: Jun 05, 2019 | 8:16 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीला बाहुबली चित्रपटानंतर मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या अनुष्काने आपले वजन कमी केल्यामुळे ती चर्चेत आहे. अनुष्काचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीकडून फिटनेसचं सिक्रेट शेअर
Follow us on

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीला बाहुबली चित्रपटानंतर मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या अनुष्काने आपले वजन कमी केल्यामुळे ती चर्चेत आहे. अनुष्काचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनुष्काने आपले वजन कमी केल्याचे सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे अनुष्काचा नवा लूक सर्वांसमोर आला आहे. फोटो पाहून समजते की, अनुष्काने आपले वजन कमी केलेलं आहे. अनुष्काने एका चित्रपटासाठी आपले वजन कमी केल्याचे सांगितलं जात आहे.

अनुष्काने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘द मॅजिक वेट-लॉस पिल’, द मॅजिक वेट-लॉस पिल हे पुस्तक अनुष्काच्या वेट लॉस जर्नीवर लिहले आहे. अनुष्काचे न्यूट्रिनिस्ट ल्यूक कौटिन्होने हे पुस्तक लिहलं आहे. अनुष्काने सोशलमीडियावर आपल्या चाहत्यांसोबत आपल्या फिटनेसचे सिक्रेट शेअर केलं आहे.

अनुष्काच्या वजन कमी करण्याच्या 62 पद्धती या पुस्तकात दिल्या आहेत. हे पुस्तक घेतल्यावर तुम्हीही फिट राहू शकता. या पुस्तकामध्ये हेल्थी लाईफसोबत वजन कमी करण्याच्या टिप्स दिलेल्या आहेत.

दरम्यान, अनुष्का सध्या आपल्या काही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आणि प्रभास-अनुष्काच्या जोडीला चाहतेही मोठ्या प्रमाणात पसंती देतात. अनुष्काने अनेक तामिळ आणि तेलगू चित्रपटात काम केलं आहे.