Akshat Utkarsh Death Case | अभिनेता अक्षत उत्कर्षची हत्या झाल्याचा मुंबई पोलिसांचा दावा, पुन्हा तपास होणार

| Updated on: Nov 20, 2020 | 2:41 PM

अंबोली पोलीस स्थानकात अक्षतच्या मृत्यू प्रकरणात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 302 अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Akshat Utkarsh Death Case | अभिनेता अक्षत उत्कर्षची हत्या झाल्याचा मुंबई पोलिसांचा दावा, पुन्हा तपास होणार
Follow us on

मुंबई : नवोदित अभिनेता अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh Death Case) याने 29 सप्टेंबर रोजीगळफास घेत आपले आयुष्य संपवले होते. या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आत मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या नसून, अक्षतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. अंबोली पोलीस स्थानकात अक्षतच्या मृत्यू प्रकरणात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 302 अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम 34 अंतर्गतदेखील गुन्हा नोंदवला आहे (Akshat Utkarsh Death Case Mumbai Police files Murder Case).

या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत, एकापेक्षा अधिक लोकांनी अक्षतची हत्या केल्याचे म्हटले आहे. अक्षतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनीदेखील हत्येचा संशय व्यक्त केला होता. मात्र, त्यावेळी ही आत्महत्या असल्याचे म्हटले गेले. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षत स्नेहा नावाच्या मुलीबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होता. स्नेहानेच अक्षतच्या आत्महत्येची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवली होती.

चित्रपटात चमकण्यासाठी मायानगरी गाठली…

नवोदित अभिनेता अक्षत उत्कर्षचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यावेळी अक्षतच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता. चित्रपट क्षेत्रात नशिब आजमावण्याच्या उद्देशाने अक्षत उत्कर्ष डोळ्यात स्वप्न घेऊन बिहारहून मुंबईला आला होता. गेल्या काही काळापासून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत होता (Akshat Utkarsh Death Case Mumbai Police files Murder Case).

अक्षतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेता त्रिपुरारी कुमार चौधरी याने त्याच्या मृत्यूची बातमी फेसबुकवर शेअर करत “बॉलिवूड, स्थानिग उद्योग बाहेरील लोकांना काम देत नाहीत आणि कलाकारांना आत्महत्या करण्यासाठी दबाव आणत आहेत” असा आरोप केला होता.

कोण होता अक्षत उत्कर्ष?

अक्षत उत्कर्ष बिहारमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिकंदरपूर गावचा रहिवासी होता. रविवारी मृत्यूच्या काही वेळ आधीच त्याचे वडिलांशी फोनवर बोलणेही झाले होते. त्यावेळी सगळे काही ठीक होते, मात्र रात्री उशिरा अचानक त्याच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे शेवटच्या फोननंतर अचानक असे काय घडले, असा सवाल अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी विचारला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आपल्याला सहकार्य न केल्याचा आरोप अक्षतच्या नातेवाईकांनी केला होता. एफआयआर दाखल करण्यात आला आहे, मात्र मुंबई पोलिसांनी अधिक माहिती देत नाहीत, असा दावा केला जात होता. आता मुंबई पोलीस पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

(Akshat Utkarsh Death Case Mumbai Police files Murder Case)