Itlay: इटलीतील 30 वर्षानंतर चमत्कार, त्या गावात मुलीचा झाला जन्म, आता चर्चा जगभर
Itlay Ancient Village: इटलीत एक मोठी घटना घडली आहे. तिची जगभर चर्चा सुरू आहे. एका डोंगरांनी आणि जंगलांनी वेढलेल्या या गावात 30 वर्षांनी मुलींच्या किंकळण्याचा आवाज घुमतोय. पण का होतेय जगात या गोष्टीची खास चर्चा?

Pagliara Dei Marsi Village : पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा छोटा देश इटलीतील एक घटना सध्या जगभरात चर्चेत आहे. अब्रुजो क्षेत्रातील या जुन्या गावात एक आनंदाची गोष्ट घडली आहे. या गावाचे नाव पाग्लियारा देई मार्सी असं आहे. या गावात जवळपास 30 वर्षानंतर मुलाचा जन्म झाला आहे. मार्च 2025 मध्ये जन्माला आलेली लारा बुस्सी त्राबुक्को ही यागावातील जवळपास तीन दशकानंतरची पहिली मुलगी आहे. जंगल आणि डोंगराने वेढलेल्या या छोट्या गावात अनेक दिवसानंतर पहिल्यांदा मुलीची किंकाळी ऐकू आली. या गावात सातत्याने जन्मदर घसरलेला आहे. या गावात मनुष्यापेक्षा मांजरांची संख्या अधिक आहे. येथील अनेक घरं ओसाड पडली आहेत.
या गावाची लोकसंख्या अवघी 20
लाराचे जन्म गाव पाग्लियारा देई मार्सी मध्ये एकूण लोकसंख्या अवघी 20 इतकी आहे. गावातील चर्चेमध्ये या मुलीचं नाव ठेवण्यात आलं. या नामकरण सोहळ्यात संपूर्ण गाव सहभागी झालं. या मुलीच्या किंकाळ्यामुळे या गावात जणू चैतन्य आलं आहे. या गावाच्या आसपासच्या गावातही आनंदाची लहर आली आहे. पाग्लियारा देई मार्सी या गावातील जन्मदर सातत्याने घसरत आहे. तर अनेक जणांनी गाव सोडल्याने हे गाव ओसाड आणि भकास झाले आहे. पण या मुलीच्या जन्मदराने इटलीत आनंदोत्सव साजरा झाला.
इटलीत लोकसंख्येचे मोठे संकट
लाराचा जन्म त्यावेळी झाला आहे, जेव्हा इटलीत लोकसंख्येचे संकट गंभीर झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2024 मध्ये देशाचा जन्मदर सर्वात निच्चांकी स्तरावर आहे. वर्षभरात या देशात केवळ 3.7 लाख मुलांचा जन्म झाला आहे. एक महिला सरासरी 1.18 मुलं जन्माला घालत आहेत. हा युरोपमधील सर्वात कमी जन्मदर मानल्या जात आहे. 2025 च्या सुरुवातीला तर ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे या मुलीचा जन्म चर्चेचा विषय ठरला आहे.
केवळ वृद्धांचे गाव
इटलीतील अनेक गावात आता लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. गावची गावं खाली होत आहे. येथील शाळा बंद होत आहेत. गावात थांबायला कोणी तयार नाही. प्रत्येक जण शहराकडे अथवा युरोपात इतर ठिकाणी स्थायिक होत आहेत. त्यामुळे इटलीवर कुशल मनुष्यबळाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आता गावात केवळ वृद्ध लोक राहत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी मात्र तरुण वर्ग नाही. त्यामुळे सरकारसमोर पण मोठे आव्हान उभे राहिले आहे.
