AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: ‘जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागले’, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचा सर्वात मोठा कबुलीनामा

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात नेत्यांची भीतीने गाळण उडाली होती, या काळात भारत मोठा निर्णय घेण्याची भीती त्यांना सतावत होती. याविषयीचे एक मोठे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. त्यांनी याविषयीचा जाहीर कबुलीनामा दिला आहे.

Operation Sindoor: 'जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागले', पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचा सर्वात मोठा कबुलीनामा
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: Dec 28, 2025 | 9:40 AM
Share

Pakistan President Asif Ali Zardari: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे यावर्षी 22 एप्रिल रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये जवळपास 26 पर्यंटकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर भारताने 6-7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तानात घुसून आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 तळ उद्धवस्त करण्यात आली. पाकिस्तानात घुसून भारताने एअर स्ट्राईक केली. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या विनंतीवरुन नंतर दोन्ही देशातील संघर्ष थांबवण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यासाठीचे क्रेडिट घेत आहेत. पण ऑपरेशन सिंदूरमुळे पाकच्या अनेक नेत्यांची भीतीने गाळण उडाली होती. याची जाहीर कबुलीच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दिली आहे.

आसिफ अली म्हणाले संघर्ष होणार याची कुणकुण

ऑपरेशन सिंदूरविषयी राष्ट्रपती आसिफ अली झरदारीय यांनी जाहीर कबुलीनामा दिला. पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात त्यांनी याविषयीचे वक्तव्य केले. ते म्हणाले की एक प्रतिनिधी माझ्याकडे आला आणि त्याने सांगितले की दोन्ही देशात संघर्ष सुरू झाला आहे. पण मी चार दिवस अगोदरपासूनच सांगितले होते की दोन्ही देशात मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे मला भारत कारवाई करणार याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

युद्ध सुरू झाले, बंकरमध्ये जावे लागले

युद्ध सुरू झाल्याचे या संरक्षण दलातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्याने मला बंकरमध्ये लपण्यास सांगितले. त्यामुळे जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झाले, तेव्हा पाकिस्तानमधील अनेक नेते, अधिकारी हे सुरक्षेसाठी बंकरमध्ये लपल्याची जाहीर कबुलीच झरदारी यांनी दिली. पण त्याचवेळी त्यांनी फुशारकीही दाखवली. पाकिस्तान मैदानात दोन हात करायला घाबरत नाही. मैदानातील लढाईसाठी पाकिस्तान तयार आहे. आमच्याकडेही शस्त्र आहेत. आम्ही जीव द्यायला तयार आहोत, अशा वल्गना नंतर त्यांनी कार्यक्रमात केल्या. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियात खिल्ली उडवण्यात आली आहे. जीव द्यायला तयार होतात, तर मग बंकरमध्ये का लपला अशा कमेंट सोशल मीडियावर येत आहे.

भारताला झरदारींची भीती

या कार्यक्रमात आसिफ अली झरदारी यांनी भारताला पोकळ धमकी दिली. भारताने हे विसरू जावे की तुम्ही गोळ्या मारल तर आम्ही जेवणाचं ताट पुढं करू. आम्ही गोळ्या घालणार अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. तर सिंधु जल करार निलंबित केल्याने पाकिस्तानसमोर जलसंकट उभं ठाकलं आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.