अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू, एम्समध्ये उपचार सुरु

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. अमित शाह यांना दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. एम्सचे डॉक्टर गुलेरिया हे अमित शाह यांच्यावर उपचार करत आहेत. अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. शाह यांना […]

अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू, एम्समध्ये उपचार सुरु
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. अमित शाह यांना दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. एम्सचे डॉक्टर गुलेरिया हे अमित शाह यांच्यावर उपचार करत आहेत.

अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यानुसार एम्समध्ये शाह यांच्यावर डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले आहेत.

स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरवरुन दिली. त्यांनी म्हटले की, “मला स्वाईन फ्ल्यू झालं आहे. सध्या उपचार सुरु आहेत. ईश्वरच्या कृपेने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने आणि शुभेच्छांमुळे लवकरच बरा होईन.”

दरम्यान, कालच देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही कॅन्सरचं निदान झालं आहे. अरुण जेटली कालच उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याची बातमी आली. जेटली हे किडनीसंबंधी आजारावरील उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अरुण जेटली यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर अर्थात पेशींचा कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.