मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील अशी गावकऱ्यांमध्ये भीती, आंतरजिल्हा एसटीचा निर्णय लवकरच : अनिल परब

| Updated on: May 11, 2020 | 3:34 PM

"मुंबईतला कोरोना आपल्या गावात येईल. त्यामुळे काही लोकांनी आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीला विरोध केला", असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. (Anil Parab on Inter-District ST decision).

मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील अशी गावकऱ्यांमध्ये भीती, आंतरजिल्हा एसटीचा निर्णय लवकरच : अनिल परब
Follow us on

मुंबई :मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील, अशी भीती राज्यातील (Anil Parab on Inter-District ST decision) विविध गावांच्या गावकऱ्यांनामध्ये पसरली आहे. या भीतीतूनच मुंबईतून अन्य जिल्ह्यांमध्ये माणसं पाठवू नका आणि कोरोना पसरवून नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीवर नियोजन करुन याबाबत आम्ही निर्णय घेऊ”, असं आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं आहे (Anil Parab on Inter-District ST decision).

राज्यात लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिक आपलं गाव, घरदार सोडून इतर जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आपापल्या गावी जाता यावं यासाठी राज्य सरकार नियोजन करत आहेत. मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो नागरिक अडकले आहेत. त्यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा आहे. मात्र, मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुंबईत अडकलेले लोक गावात कोरोना घेऊन येतील, अशी भीती गावकऱ्यांमध्ये असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

“मुंबईतला कोरोना आपल्या गावात येईल. त्यामुळे काही लोकांनी आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीला विरोध केला. अखेर आंतरजिल्ह्याचा निर्णय आम्ही मागे घेतला. मात्र, आंतरजिल्ह्याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय घेऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच सगळं नियोजन करु. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीदेखील काळजी घेऊन आम्ही अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करु”, असं अनिल परब म्हणाले.

“जी लोकं परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छित आहेत, त्यांना एसटी मोफत आहे. दोन दिवसांपासून जे चित्र उभं राहिलं होतं की, सर्व लोक चालत निघाले आहेत, त्यांना कालपासून आपल्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचं काम एसटीने केलं आहे. काल एका दिवसात 250 ते 300 बसमार्फत जवळपास 5 हजार प्रवाशांना राज्याच्या सीमेवर सोडलं. त्याचबरोबर 3 हजार प्रवाशांना आपल्या राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या जिल्ह्यांत सोडलं”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

दरम्यान, “एसटी डेपोमध्ये गर्दी करु नका. आपली काळजी आम्हाला आहे, लवकरात लवकर निर्णय घेऊ, कृपया स्टॅंडवर जाऊ नका. तिथे प्रक्रिया होणार नाही. पोलीस स्टेशन किंवा तहसीलला प्रक्रिया पूर्ण करायची आहे”, असंदेखील अनिल परब यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे.

संंबंधित बातम्या :

PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल, सहकुटुंब उपस्थिती