Melghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

| Updated on: Jun 20, 2020 | 11:32 AM

बारुगव्हाण या गावातील 26 दिवसांच्या चिमुकलीला पोटफुगीवरुन पोटाला गरम सळईने चटके दिल्याचा अघोरी प्रकार घडला. (Melghat Superstition another case)

Melghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर
Follow us on

अमरावती : मेळघाटातील अतिदुर्गम भागात बुवाबाजीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मांत्रिकाच्या सांगण्यावरुन 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर 100 चटके दिल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता केवळ 26 दिवसांच्या चिमुकलीलाही चटके दिल्याचं उघड झालं आहे. बारुगव्हाण या गावातील 26 दिवसांच्या चिमुकलीला पोटफुगीवरुन पोटाला गरम सळईने चटके दिल्याचा अघोरी प्रकार घडला. (Melghat Superstition another case)

हा धक्कादायक प्रकार आल्यानंतर चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल करुन, उपचार करण्यात येत आहेत. मात्र पोटफुगीसारख्या आजारांवर पोटाला गरम चटके देण्याचा अघोरी प्रकार मेळघाटात सर्रास सुरु असल्याचं यावरुन दिसून येत आहे. असे अघोरी सल्ले देणाऱ्या भोंदू बाबांना तातडीने बेड्या ठोकून त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

8 महिन्याच्या बाळालाही चटके

अंधश्रद्धेतून तांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई वडिलांनी आजारी बाळाच्या पोटावर गरम विळ्याने तब्बल 100 चटके दिल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. हा धक्कादायक प्रकार बोरदा गावात घडला. 8 महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर इतके चटके खुद्द आई-बापाने एका तांत्रिकाच्या सल्ल्याने दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

या बालकाला आठ दिवसापासून खोकला आणि पोट फुगत असल्याचा त्रास होता. त्याला दवाखान्यात न नेता भगत भुमका या तांत्रिकाकडे नेले. त्याच्या सांगण्यावरुन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले.

याप्रकारावरुन मेळघाटातील अंधश्रद्धेचं भीषण वास्तव समोर आलं आहे. अशा पोटफुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. या बालकाला ताप होता, त्यामुळे हा गंभीर प्रकार अंधश्रद्धेतून घडला आहे.

(Melghat Superstition another case)

संबंधित बातम्या 

Amravati Superstition | टिचभर पोटावर 100 चटके, 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर इजा, अंधश्रद्धेचा कहर