corona virus : 27 मार्चपर्यंत अॅपलचे सर्व स्टोअर्स बंद राहणार

| Updated on: Mar 15, 2020 | 11:14 PM

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अॅपलने चीनच्या बाहेरील सर्व रिटेल स्टोअर्स 27 मार्च पर्यंत बंद करण्याचा (Apple store close due to corona virus) निर्णय घेतला आहे.

corona virus : 27 मार्चपर्यंत अॅपलचे सर्व स्टोअर्स बंद राहणार
अ‍ॅपल 7 जूनला लॉन्च करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स
Follow us on

मुंबई : जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अॅपलने चीनच्या बाहेरील सर्व रिटेल स्टोअर्स 27 मार्च पर्यंत बंद करण्याचा (Apple store close due to corona virus) निर्णय घेतला आहे. या दरम्यान अॅपलचे सर्व कर्माचारी घरातून काम करणार आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अॅमेरिकेतील अनेक स्टोअर बंद करण्यात आले. अॅपलकडून वर्ल्डवाईड डेवलेपर्स कॉन्फरन्सही ऑनलाईन घेतली (Apple store close due to corona virus) जाणार आहे.

अॅपलकडून 15 मिलियन डॉलरच्या मदतीची घोषणा

भयंकर अशा कोरोना व्हायरसवर कंट्रोल मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अॅपलकडून 15 मिलियन डॉलरची घोषणा करण्यात आली आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अॅपलच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही माहिती दिली. याशिवाय अॅपलने कर्मचाऱ्यांनाही स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचे सांगितले आहे. तसेच कुक यांनी 27 मार्चपर्यंत चीनसोडून जगभरातील सर्व अॅपल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

“आम्ही असा निर्णय चायनामध्येही घेतला होता आणि त्याचा इथे फायदा झाला. लोकांची, ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. चायनामध्ये आता नवीन कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. त्यामुळे चायनामधील अॅपल स्टोअर्स पुन्हा सुरु करण्यात आले आहेत”, असं कुक यांनी सांगितले.

“अॅपलचे जगभरात 400 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. ऑफलाईन स्टोअर्स बंद असले तरी ऑनलाईन सेवा आमची सुरु राहिल. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट खरेदी करु शकता”, असंही कुक यांनी सांगितले.