कोल्हापुरात मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला

कोल्हापूर : कोल्हापर शहरातील  ‘इंडियन ग्रुप’ येथे चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली. यात काही पोलिसांना मारहाणही करण्यात आली. काल रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे, ‘इंडियन ग्रुप’ कार्यालयात चालणारा हा मटका अड्डा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि कोल्हापूरच्या माजी […]

कोल्हापुरात मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

कोल्हापूर : कोल्हापर शहरातील  ‘इंडियन ग्रुप’ येथे चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली. यात काही पोलिसांना मारहाणही करण्यात आली. काल रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात घडली.

धक्कादायक म्हणजे, ‘इंडियन ग्रुप’ कार्यालयात चालणारा हा मटका अड्डा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि कोल्हापूरच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या पतीचा आहे. सलीम मुल्ला असे राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचं नाव आहे.

पोलिस ज्यावेळी मटका अड्ड्यावर छापा मारण्यास आले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांनी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उकसवलं. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करण्यात आला.

छाटा टाकण्यास आलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्याशी हल्लेखोरांची झटापट झाली. ऐश्वर्य शर्मा यांच्या सुरक्षारक्षकाची रिव्हॉल्व्हरही हल्लेखोरांनी हिसकावून घेतली आणि पळ काढला.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मुल्लाच्या घराचीही झडती घेतली. शमा मुल्ला यांच्यासह जवळपास 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी काही आरोपींची धरपकड सुरु करण्यात आली आहे.