AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोरोना व्हायरसची लस द्या, परळीतील उपोषणकर्त्यांची मागणी

"आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोरोना व्हायरसची लस द्या," अशी मागणी परळी येथील प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांनी केली (Beed Protesters Corona Virus Vaccine) आहे.

आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोरोना व्हायरसची लस द्या, परळीतील उपोषणकर्त्यांची मागणी
| Updated on: Mar 13, 2020 | 8:43 PM
Share

बीड : एकीकडे कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात (Beed Protesters Corona Virus Vaccine) आहेत. तर दुसरीकडे मात्र “आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोरोना व्हायरसची लस द्या,” अशी मागणी परळी येथील प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांनी केली आहे.

विविध मागण्यांसाठी (Beed Protesters Corona Virus Vaccine) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने बेमुदत  उपोषण सुरु आहे. प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त आपल्या कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसले आहे.

“आम्ही गेल्या 10 वर्षांपासून प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहोत. मात्र आमच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. आता आम्ही हे बॅनर लावलं आहे. सरकारने एकत्र येण्यास मनाई केली असतानाही आम्ही 500 जण एकत्र उपोषणाला बसले आहोत. यापूर्वी वेळोवेळी प्रशासन दरबारी मागण्यांची निवेदन देऊन देखील कोणतेही पाऊल उचलली जात नव्हती.

एकतर आम्हाला न्याय द्या, अन्यथा कोरोनाची लस देऊन मारुन टाका अशी मागणी केली आहे. जर आम्हाला जीवदान द्यायचं असेल तर मागण्या मान्य करा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात कोरोनाचे  (Nagpur corona positive) आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण 3 रुग्ण (Nagpur corona positive) झाले आहेत. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णाची पत्नी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली. या तीनही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Corona | पुण्यात सर्व शाळांना सुट्टी, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये थिएटर्स, जिम बंद : मुख्यमंत्री

कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.

यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (Beed Protesters Corona Virus Vaccine) सांगितले.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.