दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये प्रताप, नारळ पाणी ऐवजी दारुची विक्री

काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती बाईकमधील पेट्रोल टाकीतून दारु विक्री करत असल्याचं समोर आलं (liquor smuggling in coconut bihar) होतं.

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये प्रताप, नारळ पाणी ऐवजी दारुची विक्री

पाटणा : राज्य सरकारने बिहारमध्ये दारु बंदी लागू केली (liquor smuggling in coconut bihar) आहे. त्यामुळे बिहारमध्ये दारु विकणाऱ्यांसह पिणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येते. मात्र अवैधरित्या दारुच्या विक्री करण्यासाठी एक नवी युक्ती शोधून काढली आहे. बिहारमध्ये एक व्यक्ती नारळ पाणीच्या नावावर अवैधरित्या दारु विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवादा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील प्रजातंत्र चौकात एक नारळ पाणी विक्री करणारा विक्रेता असतो. पण तो नारळ पाणीच्या ऐवजी नारळात दारु ठेवून अवैधरित्या दारुविक्री करतो. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (4 फेब्रुवारी) बिहार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी त्या नारळपाणी विक्रेत्याच्या दुकानातून 200 मिलीलीटरचे 16 पॅकेट आणि देशी दारुच्या सात बॉटल्स जप्त केल्या आहेत.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे. तसेच त्या दुकानात अवैधरित्या विक्री होणारी दारुही जप्त केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच अन्य काही ठिकाणी अशाप्रकराच्या युक्ती वापरुन दारु विक्री केली जात आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती बाईकमधील पेट्रोल टाकीतून दारु विक्री करत असल्याचं समोर आलं (liquor smuggling in coconut bihar) होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI