वाराणसीत मोदींसाठी पुन्हा एकदा लकी चेअर वापरणार

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीत गेल्या पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली खुर्ची पुन्हा एकदा बाहेर काढण्यात येणार आहे. भाजपसाठी ही खुर्ची शुभ मानली जाते. मोदींचा 8 मार्चला वाराणसी दौरा आहे. या दौऱ्यात मोदींना बसवण्यासाठी पुन्हा एकदा लकी चेअरचा वापर केला जाणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पंतप्रधान मोदी त्यांच्या वाराणसी या […]

वाराणसीत मोदींसाठी पुन्हा एकदा लकी चेअर वापरणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीत गेल्या पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली खुर्ची पुन्हा एकदा बाहेर काढण्यात येणार आहे. भाजपसाठी ही खुर्ची शुभ मानली जाते. मोदींचा 8 मार्चला वाराणसी दौरा आहे. या दौऱ्यात मोदींना बसवण्यासाठी पुन्हा एकदा लकी चेअरचा वापर केला जाणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

पंतप्रधान मोदी त्यांच्या वाराणसी या मतदारसंघात शुक्रवारी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभाही होईल. या कार्यक्रमात लकी चेअरचा वापर केला जाणार आहे. सभेसाठी पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली ही खुर्ची बाहेर काढण्यात आली असून तिची रंगरंगोटी आणि सजावट करण्यात येत आहे. 8 मार्चला होणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खुर्चीवर बसावे आणि केंद्रात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन व्हावे अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात 19 ऑक्टोबर 2013 मध्ये इंदिरा नगर येथील पहिल्या प्रचार सभेत मोदी याच खुर्चीवर बसले होते, असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. एप्रिल 2014 मध्ये कानपूरमधील कोयला नगरमध्ये झालेल्या सभेत मोदी पुन्हा या खुर्चीवर बसले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि मोदी पंतप्रधान बनले. सप्टेंबर 2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी निराला नगरमध्ये झालेल्या सभेतही मोदी या खुर्चीत बसले होते. यानंतर भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

या खुर्चीचा वापर केल्यानंतर भाजपला फायदा होतो, अशी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही खुर्ची चर्चेचा मुद्दा बनली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीत जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वाराणसीत मोदींची ही शेवटची सभा असेल. त्यामुळे विविध विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.