IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपसाठी बुमराहला हर्षल पटेलची कडवी टक्कर

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : रविवारी 28 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. या डबल हेडरनंतरही जसप्रीत बुमराह याच्याकडेच पर्पल कॅप कायम आहे.

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपसाठी बुमराहला हर्षल पटेलची कडवी टक्कर
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 12:17 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनसामने होते. चेन्नईने या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला. चेन्नईने हैदराबादसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादची हवा काढली. चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 18.5 ओव्हरमध्ये 134 धावांवर गुंडाळलं. चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजूर रहमान आणि मथीशा पथीराणा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. या सामन्यानंतर पर्पल कॅपसाठीची चुरस आणखी वाढली आहे. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. तसेच हंगामादरम्यान सर्वाधिक विकेट्सनुसार पर्पल कॅपची अदलाबदल होते असते.

रविवारी 28 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. चेन्नई हैदराबाद सामन्याआधी गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना झाला. आरसीबीने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. गुजरातने विजयसााठी दिलेलं 201 धावांचं आव्हान आरसीबीने 16 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या सामन्यामुळे पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये कोणताही फरक पडला नाही. मात्र चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर पर्पल कॅपसाठीची रस्सीखेच वाढली आहे. चेन्नईच्या 2 गोलंदाजांनी आपला पर्पल कॅपवरील दावा कायम राखला आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील 5 गोलदाजांमध्ये चेन्नईचे सर्वाधिक 2 गोलंदाज आहेत. हैदराबाद आणि पंजाबचा प्रत्येकी 1-1 गोलंदाज आहे. तर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह याच्याकडे पर्पल कॅप आहे. मात्र गंमत अशी की टॉप 5 मधील पहिल्या गोलंदाजांच्या नावावर प्रत्येकी समसमान 14 विकेट्स आहेत. जसप्रीत बुमराह आणि चेन्नईचा मुस्तफिजुर या दोघांच्या नावावर 14-14 विकेट्स आहेत. मात्र मुस्तफिजुरच्या तुलनेत बुमराहचा इकॉनॉमी आणि एव्हरेज सरस आहे. त्यामुळे पर्पल कॅप बुमराहकडे आहे.

पर्पल कॅपसाठी जोरदार रस्सीखेच

चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पथीराना

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

Non Stop LIVE Update
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.