IPL 2024, CSK vs SRH : चेन्नईच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितला टर्निंग पॉइंट, इथे जिंकला सामना

आयपीएल 2024 स्पर्धेतील 46व्या सामन्यात पहिली फलंदाजी करूनही विजय चेन्नईच्या पारड्यात पडला. कारण दुसऱ्या डावात पडत असलेलं दव अनेकदा गोलंदाजांना त्रासदायक ठरतं. पण चेन्नईने अशा स्थितीतही हैदराबादला 78 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने या खेळाडूंना श्रेय देत सांगितला टर्निंग पॉइंट.

IPL 2024, CSK vs SRH : चेन्नईच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितला टर्निंग पॉइंट, इथे जिंकला सामना
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 12:14 AM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 46 व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर ऋतुराज गायकवाड नाराज झाला होता. कारण दुसऱ्या डावात पडत असलेल्या दव पाहता गोलंदाजी करणं कठीण जातं. याचा अंदाज असल्याने त्याने नाणेफेक गमवल्याचं दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. पहिल्यांदा मिळालेली फलंदाजी चेन्नई सुपर किंग्सच्या पथ्यावर पडली.चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. सनरायझर्स हैदराबादचा संघ मात्र 18.5 षटकात सर्वबाद 134 धावा करू शकला. चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत केलं. खरं तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने केलेल्या 98 धावांच्या जोरावर संघाला 200 पार मजल मारता आली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सामन्यानंतर विजयाचं श्रेय देताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने टर्निंग पॉइंट सांगितला.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ” इम्पॅक्ट प्लेयर्स नियमामुळे तुम्हाला नेहमी अतिरिक्त 20 धावा हव्या असतात. पॉवरप्लेमध्ये विकेट न देणं. हाच एकमेव मार्ग आहे की विरोधकांना बॅकफूटवर ढकलू शकतो. देशपांडेने खरंच चांगली गोलंदाजी केवी. त्याच्या मेहनतीचे फळ मिळालं आहे. जडेजाचाही इथे उल्लेख करेन. या ओल्या मैदानात फक्त 22 धावा देणं हाच सामना टर्निंग स्पेल होता. मी जास्त बोलत नाही. ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठांना काय करावे हे सांगता येत नाही. तुम्हाला मागची जागा घ्यायची आणि त्यांना त्यांचे काम करू द्यायचं.” तुषार देशपांडेने 3 षटकात 27 धावा देत 4 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने 4 षटकात फक्त 22 धावा देत 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.