भाजप इलेक्शन मोडवर,अमित शाहांचे मिशन बंगाल तर जे.पी.नड्डांची भारत प्रवास यात्रा

| Updated on: Nov 18, 2020 | 5:46 PM

अमित शाह यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तर, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भारत प्रवास यात्रेची घोषणा केली आहे. (BJP President J P Nadda will start Bharat Pravas Yatra from December)

भाजप इलेक्शन मोडवर,अमित शाहांचे मिशन बंगाल तर जे.पी.नड्डांची भारत प्रवास यात्रा
Follow us on

नवी दिल्ली : भाजप बिहारमधील विजयानंतर आगामी काळातील निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तर, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भारत प्रवास यात्रेची घोषणा केली आहे. भाजपची भारत प्रवास यात्रा 100 दिवस सुरु राहणार आहे. (BJP President J P Nadda will start Bharat Pravas Yatra from december)

भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा भारत प्रवास यात्रा काढणार आहेत. ही यात्रा 100 दिवस सुरु राहील, या दरम्यान नड्डा भाजपच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. जे.पी. नड्डा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची मते जाणून गेणार आहेत. भाजपच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

डिसेंबरमध्ये सुरु होणार यात्रा

भाजपची भारत प्रवास यात्रा डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. आगामी एक ते दोन वर्षात निवडणुका असणाऱ्या राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. भाजपच्या जिल्हा कार्यालयात जे.पी.नड्डा संबंधित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांमधून भारत प्रवास यात्रा काढण्यात येणार आहे. या राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अमित शाह यांचे मिशन बंगाल

अमित शाह हे सातत्यानं पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहेत. बिहारमध्ये प्रचाराला न जाता अमित शाह बंगालमध्ये गेले होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अमित शाह पुन्हा एकदा बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये पाच झोन तयार केले असून प्रत्येक झोनची जबाबदारी एका नेत्यावर सोपविली आहे. त्रिपुरात डाव्या  पक्षांची सत्ता उलथवून कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदानपूर या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे नवद्वीप, विनोद सोनकर यांच्याकडे राड बंग तर केंद्रीय नेते हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

दरम्यान, पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपसमोर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे मोठे आव्हान आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टर्म ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे.

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू

(BJP President J P Nadda will start Bharat Pravas Yatra from December)