अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.(Blind student Confusion about Final Year Exam) 

अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. यानुसार प्रत्येक विद्यापीठाला परीक्षा घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र शासनानं परीक्षा कशा घ्यायच्या हे विद्यापीठांवर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र यामुळे अंध विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. (Blind student Confusion about Final Year Exam)

पुणे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. परंतु यामुळेच अंध विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जर परीक्षा ऑनलाईन दिल्या तर आपल्याला लेखनिक उपलब्ध होणार आहेत का? आपल्याला 20 मिनिटांचा वेळ अधिक मिळणार आहे का? ऑनलाईन परीक्षा आपण स्वतंत्र पद्धतीने देऊ शकणार आहोत का? तसेच या परीक्षा आम्ही स्वतंत्र पद्धतीने देऊ शकतो का? अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ accessible website किंवा परीक्षा देण्याचे कुठलेही ऑनलाईन माध्यम accessible असेल की नाही? असे प्रश्नही उपस्थितीत होत आहे.

तर दुसरीकडे ऑफलाईन परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम  निर्माण झाला आहे. आपण कुठे राहणार किंवा पुण्यामध्ये जाऊन कशी परीक्षा देणार? परीक्षास्थळी आपण पोहोचल्यावर आपल्याला लेखनिक उपलब्ध होतील का? असे अनेक प्रश्न अंध विद्यार्थ्यांसमोर आहेत. लेखनिक विद्यार्थी आपापल्या परीने या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मॅनेज कसे करणार, असे अनेक प्रश्न अंध विद्यार्थ्यांसमोर आहे.

खरं तर परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन हा प्रश्न आजही कायम आहे. यामुळेच अंध विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे. ते सुद्धा गोंधळात आहेत. अंध विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयांना संपर्क केला असता, बऱ्याच महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा पर्याय सुचवताना दिसत आहेत.

पण इतर काही प्रश्न उपस्थित केल्यास प्रश्नांची उत्तर देताना टाळाटाळ करत आहेत. म्हणजेच खर्‍या अर्थाने अंध विद्यार्थ्यांचं समाधान होईल अशी उत्तर कोणीच देताना दिसत नाही. म्हणूनच खर्‍या अर्थाने अंध विद्यार्थ्यांसमोर संभ्रम निर्माण झाला आहे.(Blind student Confusion about Final Year Exam)

संबंधित बातम्या :

केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

सिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल

Published On - 10:48 pm, Tue, 15 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI