BMW ची नवीन लक्झरी 220i M Sport कार लाँच, 7.1 सेकंदात 100Km स्पीड पकडणार

| Updated on: Jan 12, 2021 | 2:52 PM

लग्जरी कार बनवणारी कंपनी बीएमडब्ल्यूने आज भारतात त्यांची नवीन कार BMW 2 Series Gran Coupe लाँच केली आहे.

BMW ची नवीन लक्झरी 220i M Sport कार लाँच, 7.1 सेकंदात 100Km स्पीड पकडणार
Follow us on

मुंबई : लग्जरी कार बनवणारी कंपनी बीएमडब्ल्यूने आज भारतात त्यांची नवीन कार BMW 2 Series Gran Coupe लाँच केली आहे. या कारची इंट्रोडक्टरी किंमत 40.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. कंपनीने ही कार ‘M Sport’ पॅकेजसह सादर केली आहे. ही नवीन BMW 220i पेट्रोल व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारचं उत्पादन BMW च्या चेन्नई येथील प्लांटमध्ये केलं जाणार आहे. कंपनीने ही कार यापूर्वीच दोन डिझेल व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे. (BMW 2 Series Gran Coupe Petrol Launched In India At Rs. 40.90 Lakh, know price features and specs)

या कारच्या इंजिनाबाबत बोलायचे झाल्यास या नवीन 220i Sport कारमध्ये 2.0 लीटर ट्विन टर्बो फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 190bhp पॉवर आणि 280nm टॉर्क जनरेट करु शकतं. तसेच या इंजिनमध्ये कंपनीकडून 8 लीटर स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला आहे. ही कार केवळ 7.1 सेकंदांमध्ये शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडू शकते.

कंपनीने या कारमध्ये 2.0 लीटर, चार सिलेंडरसह डिझेल इंजिन दिलं आहे, जे 190bhp पॉवर 400nm टॉर्क जनरेट करु शकतं. या कारच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास ही कार 7.5 सेकंदांमध्ये शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडू शकते. BMW 2 Series Gran Coupe चार रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये अल्पाईन व्हाइट, ब्लॅक सॅफायर, मेलबर्न रेड आणि स्टॉर्म बे या रंगांचा समावेश आहे. सोबतच कंपनीने ‘M Sport’ व्हेरियंटमध्ये अजून दोन रंगांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये मिस्नो ब्लू आणि स्नॅपर रॉक्स या रंगांचा समावेश आहे.

या कारच्या डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास BMW 220i M Sport या कारला कंपनीने स्पोर्टी लुकसह सादर केले आहे. तसेच या कारमध्ये तुम्हाला LED हेडलँप्स, फ्रेमलेस डोर, बीएमडब्ल्यू किडनी ग्रिल (BMW Kidney Grille), एआरबी टेक्नोलॉजी, 12.3 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, 10.25 इंचांचा कंट्रोल डिस्प्ले देण्यात आला आहे.

बीएमडब्ल्यूची सर्वात मोठी सेडान 21 जानेवारीला भारतात लाँच होणार

ऑटो सेक्टरमधील एक्सपेन्सिव्ह ब्रँड BMW नवीन वर्षात एक मोठं प्रोडक्ट भारतीय मार्केटमध्ये सादर करणार आहे. नव्या वर्षात अनेक वाहनं लाँच करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. त्याची सुरुवात जानेवारी महिन्यात BMW 3 Series Gran Limousine (GL) च्या लाँचिंगने होईल. 21 जानेवारी 2021 रोजी ही सेडान लाँच केली जाणार आहे. ही कार या सीरिजमधील सर्वात लांब व्हेरिएंट असेल. यामध्ये लेगरुमसाठी भरपूर जागा देण्यात येणार आहे.

BMW 3 सीरिज ग्रॅन लिमोसिन (BMW 3 Series Gran Limousine) भारतातील सर्वात लांब आणि एंट्री लेव्हल सेडान असेल. या स्टँडर्ड कारसह सीएलएआर प्लॅटफॉर्मची शक्यता आहे. कारचं डिझाईन आणि तंत्रज्ञान बीएमडब्ल्यूच्या इतर मॉडल्सप्रमाणेच असेल. या कारमध्ये काय बदल केलेत असा सवाल निर्माण होऊ शकतो. तर या कारची साईज हाच या कारमधील सर्वात मोठा बदल आहे. या कारमध्ये BMW 3 सीरिजमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा

Renault गाड्यांवर 65 हजारांपर्यंत सूट; ट्रायबर, क्विड आणि डस्टरचा समावेश

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

लाडकी Tata Safari परत येतेय, लवकरच प्री-बुकिंगला सुरुवात होणार

(BMW 2 Series Gran Coupe Petrol Launched In India At Rs. 40.90 Lakh, know price features and specs)