
बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलांचे पदार्पण म्हणजे प्रत्येकासाठी उत्सुकता असते. यंदाच्या वर्षात अनेक कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच अजून काही कलाकारांची मुलं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयारी करत आहेत. अभिनेता गोविंदाची मुलगी टीना अहुजाने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेकंड हँड हसबेंड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती.

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द ईअर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

पुजा बेदीची मुलगी आलिया अब्राहिम लवकरच 'जवानी जानेमन' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खानही दिसणार आहे.

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलही 'पल पल दिल के पास' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत आहे.

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

आर्यन खान : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र एका चित्रपटासाठी त्याचा व्हॉईसओव्हर देण्यात आला आहे. ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी त्यानं सिंबा (Baby Lion) आवाज दिला होता. प्रेक्षकांना त्याचा आवाज चांगलाच आवडला. शाहरुखनं या चित्रपटात मुफ्सा (Father of Lion) साठी आवाज दिला होता.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा लकरच 'आरएक्स 100' चित्रपट येत आहे. सध्या तो शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा पहिला चित्रपट 'धडक' होता. यामध्ये त्याने अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत काम केलं आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. यानंतर ती 'सिंबा' चित्रपटात दिसली होती.

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती चित्रपट समजण्यासाठी शनाया गुंजन सक्सेनाच्या बायोपीकमध्ये सहाय्यक दिग्ददर्शक म्हणून काम करत आहे.