Disha Salian | दिशा सालियन मृत्यू प्रकरणची सीबीआय चौकशी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची न्यायालयीन देखरेखीखाली करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Disha Salian | दिशा सालियन मृत्यू प्रकरणची सीबीआय चौकशी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार!
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 6:18 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Probe) न्यायालयीन देखरेखीखाली करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासह, जर कोणाला या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे (Bombay High Court dismisses a PIL seeking CBI probe into the death of Disha Salian).

याचिकाकर्ते, दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे अशी याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. उलट, तुम्ही दिशाचे कोण?, असा प्रतिप्रश्न कोर्टाने याचिकाकर्त्याला विचारला. दिशा सालियनच्या मृत्यूबाबत काही घातपाताची शक्यता वाटल्यास तिचे कुटुंब यासंबंधी कायदेशीर पावले उचलेल, असे म्हणत याचिकाकर्त्याला फटकारले आहे.

(Bombay High Court dismisses a PIL seeking CBI probe into the death of Disha Salian)

मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणात कोणालाही काहीही सांगायचे असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा असे जाहीरपणे म्हटल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांशी या बाबत काहीच चर्चा न करता कोर्टाचा दरवाजा ठोठावल्याने सदर याचिका फेटाळण्यात आली आहे (Bombay High Court dismisses a PIL seeking CBI probe into the death of Disha Salian).

सुप्रीम कोर्टानेही फेटाळली याचिका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची (CBI Investigation) मागणी करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील पुनीत कौर धांडा यांनी दाखल केली होती. या याचिकेत सुशांत आणि दिशा यांच्या आत्महत्याचे एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत, याचिका फेटाळून लावली होती.

सुप्रीम कोर्टाने सदर याचिका फेटाळत  याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करणाऱ्यांना फटकारले होते. या प्रकरणात सुनावणीसाठी कोणी का हजर नाही? मागील तारखेलाही कोणीच सुनावणीसाठी का हजार नव्हते? असे असेल तर न्यायालयाने काय करावे?, असे प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. शिवाय, दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.

(Bombay High Court dismisses a PIL seeking CBI probe into the death of Disha Salian)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.