Borivali News: अतिक्रमणाच्या कारवाईवरुन राडा! BMC कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; गोपाळ शेट्टी समर्थक भिडले
Borivali BMC Encroachment Action: बोरिवलीमध्ये बेस्ट डेपोसाठी राखीव असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणावरुन जोरदार वादंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. यावेळी उत्तर मुंबई भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांचे समर्थक तसेच बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर… अतिक्रमणाच्या कारवाईवरुन राडा! Loading... {{{html}}} याबाबत […]

Borivali BMC Encroachment Action: बोरिवलीमध्ये बेस्ट डेपोसाठी राखीव असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणावरुन जोरदार वादंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. यावेळी उत्तर मुंबई भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांचे समर्थक तसेच बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर…
अतिक्रमणाच्या कारवाईवरुन राडा!
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद रोडवरील बेस्ट बस डेपोसाठी राखीव असलेल्या भूखंडावरील २७ भाडेकरूंच्या व्यावसायिक जागांवर बीएमसीने कारवाई केली. दुसरीकडे या कारवाईविरोधात माजी भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी गोपाल शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या भाडेकरुंच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन केले.
यावेळी बीएमसी कर्मचारी आणि गोपाल शेट्टी यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची तसेच धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. बीएमसीकडून कारवाई सुरू असताना ही धक्काबुक्की झाली. यामध्ये गोपाल शेट्टी यांच्या समर्थकावर बीएमसी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या राड्यानंतर गोपाल शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
गोपाल शेट्टी यांची भूमिका काय?
“काल सायंकाळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली त्यानंतर मी तातडीने इथे आलो. ही कारवाई पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने कारवाईने करण्यात आली आहे. ही महानगरपालिकेचा प्लॉट नाही प्रायव्हेट प्लॉट आहे. बिल्डरने सुप्रीम कोर्टाला चुकीची माहिती सादर करुन ही ऑर्डर घेतली आहे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने तोडा असं ऑर्डरमध्ये म्हटलेलं नाही, कोर्टाने फक्त कायदेशीर काम करा असं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यात हे सर्व संपवा असे सांगितले. यावेळी बीएमसीने विकासकांद्वारे या लोकांना पर्यायी जागा द्यायला हवी होती. जोपर्यंत या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही,” असं गोपाल शेट्टी यांनी म्हटलं आहे.