लग्न ठरवत नसल्याने आईची मुलाकडून हत्या

घरचे लोक लग्न ठरविण्याबाबत लक्ष देत नसल्यामुळे मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईची हत्या (Boy killed mother in Satara) केली आहे.

लग्न ठरवत नसल्याने आईची मुलाकडून हत्या

सातारा : घरचे लोक लग्न ठरविण्याबाबत लक्ष देत नसल्यामुळे मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईची हत्या (Boy killed mother in Satara) केली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील मोराळे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे. किरण शिंदे आरोपी मुलाचे नाव आहे. कांताबाई शिंदे असं मृत (Boy killed mother in Satara) महिलेचे नाव आहे.

खटाव तालुक्यातील मोराळे येथे संशयित आरोपी किरण शिंदे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. घरातील लोकं लग्न ठरवत नसल्यामुळे मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन हत्या केली. यावेळी शेजारच्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी मुलाने आतून दरवाजाला कडी लावली होती. जर तुम्ही दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, तर तुमचाही खून करेल, असं त्याने शेजाऱ्यांना धमकावले.

या सर्व प्रकरणानंतर आरोपी मुलाच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मुलाला अटक केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या सर्व प्रकरणात आरोपी मुलाला अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. आरोपी किरण शिंदे गेले काही दिवस लग्न करण्यासाठी इच्छुक होता. पण घरचे लग्न ठरवण्याबाबत लक्ष देत नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात किरणने आईची हत्या केली, असं सांगितले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI