AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : प्रत्येक महिलेला 300 रुपये, रोहित पवार यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप

अमरातीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीत तीन दिवसांपूर्वी जाहीर सभा पार पडलेली. या सभेत उपस्थिती लावण्यासाठी महिलांना पैशांचं वाटप केलं गेलं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांनी फक्त आरोप करुन सोडून दिलं नाही तर त्यांनी पुरावा म्हणून व्हिडीओदेखील ट्विट केला आहे.

VIDEO : प्रत्येक महिलेला 300 रुपये, रोहित पवार यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप
प्रत्येक महिलेला 300 रुपये, रोहित पवारांचा नवनीत राणांवर आरोप
| Updated on: Apr 26, 2024 | 6:47 PM
Share

खासदार नवनीत राणा यांच्या सभेसाठी पैसे वाटले असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी अमरावतीचा व्हिडीओ ट्विट करत हा आरोप केला आहे. “सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप. गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात”, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसेच “सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. “आता एकच मिशन.. ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी”, असंदेखील रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत काही महिलांना किती पैसे भेटले असे विचारले जाते? त्यावर सभेतून परतत असलेल्या महिला या 300 रुपये मिळाल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे यावेळी संभाषण करताना महिला या पाकिटदेखील दाखवतात. संबंधित व्हिडीओतून रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

व्हिडीओत नेमकं संभाषण काय?

प्रश्न – काकू पैसे मिळाले का? काय रोजाने भेटले? 300 रुपये की 400 रुपये रोजाने भेटले?

व्हिडीओतल्या काकू – हा, पैसे मिळाले

प्रश्न – नवनीत राणांसाठी आले होते ना तुम्ही?

काकू – हो…हो..

प्रश्न – 300 रुपयांनं? पण अनिलने 700 रुपयांनं पैसे उचलले

काकू – माय…

प्रश्न – तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना?, अनिलच्या ग्रुपच्या आहात ना तुम्ही? तुम्हाला किती भेटले?

काकू – 300 रुपये फक्त

प्रश्न – पाकिटं भेटले का? पाहुद्या एक पाकिट

काकू – पाकिटं फोडले आम्ही…

प्रश्न – पांढरे पाकिटं भेटले का की खाकी?

काकू – पाकिटात 300 रुपयेच आहेत

रवी राणा यांची प्रतिक्रिया काय?

रवी राणा यांनी संबंधित व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलीय. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला 1 लाखापेक्षा जास्त महिला आल्या होत्या. लाखोंच्या संख्येच्या गर्दीमध्ये आम्ही 200 महिला या पाणी पाजण्यासाठी ठेवल्या होत्या. एवढं कडाक्याचं ऊन होतं. महिलांना पाणी मिळावं या उद्देशाने आम्ही 100 ते 150 महिला ठेवल्या होत्या. त्यांना पाणी पाजण्यासाठी जो रोज ठरवला होता तो दिला. तोच वारंवार टीव्हीवर दाखवणे, विरोधकांकडून बाईट घेणं, हा धंदा चालू केला. मला असं वाटतं की, 1 लाखांपेक्षा जास्त महिला पाणी पाजण्यासाठी ठेवल्या होत्या. त्या महिलांना पैसे तर द्यावे लागतील”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.

“रोहित पवारांनी अमरावतीत येऊन पाहायला पाहिजे. या ठिकाणी जमलेली गर्दी ही नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यासाठी आलेली होती. नवनीत राणा यांच्यासोबत उभे राहून त्यांनी नारे दिले आहेत. प्रचार केला आहे. नवनीत राणा लाखोंच्या संख्येने निवडून येतील. नवनीत राणा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. रोहित पवार यांचा अभ्यास कमी आहे. विचारणारा माणूस कोर्टात सुनावणी सुरु आहे, अशा पद्धतीने विचारत आहे. सभास्थळी सर्व काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काही कामे करतात. त्यांना पैसे द्यावे लागतात”, असा निर्वाळा रवी राणा यांनी केला.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.