AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथली जनता त्यांना सोडणार नाही, त्यांना जागा दाखवणार… एकनाथ शिंदे कडाडले, थेट कॉंग्रेसवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल केलेल्या दाव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. आता नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसने केलेल्या विधानावर टीका केली. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे त्यांनी म्हटले.

इथली जनता त्यांना सोडणार नाही, त्यांना जागा दाखवणार... एकनाथ शिंदे कडाडले, थेट कॉंग्रेसवर टीका
Deputy Chief Minister Eknath Shinde
| Updated on: Dec 17, 2025 | 1:34 PM
Share

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. नुकताच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा जगाने निषेध केला. त्यानंतर आपल्या लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केली. याचा अभिमान तमाम भारतीयांना आहे. देशाच्या लष्कराच्या मागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना थेट सांगितले की, खूनचा बदला खूनने… आपल्या लष्करानेही तिथलच्या सामान्य नागरिकांवर हल्ला होऊ दिला नाही. मिसाईल हल्ले झाली आणि तेथील दहशतवादी अड्डे उद्धवस्थ झाली.

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त उत्तर पाकिस्तानला दिले. हे उत्तर लष्करी जवानांनी दिल्यानंतर अशाप्रकारचे वक्तव्य कॉंग्रेसकडून होतंय ही खरोखरच चिंताजनक बाब आहे, दुर्देवी बाब आहे, देशविघातक बाब आहे. हे देश प्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम त्यांचे उतू चालले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी जे काही बोलले त्याच्या सर्व हेडलाईन झाल्या. पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना हिंदूस्थानची जनता माफ करणार नाही.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथली जनता त्यांना सोडणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवणार. यापूर्वीही कॉंग्रेसचे नेते असतील राहूल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा हिशोब विचारत होते. किती ड्रोन पडली? किती विमाने गेली.. किती तासाने युद्ध थांबले.. तुम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे होते. कॉंग्रेसच्या काळात असे कधीही झाले नाही. त्यावेळी पी. चिदंबरम यांनी सांगितले की, त्यांच्यावर त्यावेळी दबाव होता.

तर मग हा दबाव कोणाचा होता? हे देश भक्ती नाही तर देश द्राैह आहे. मुंबईमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असतील किंवा 26-11 चा हल्ला असेल त्यावेळी तत्कालीन सरकारने असे निर्णय घ्यायला हवी होती. त्यावेळीही त्यांनी मतांचे राजकारण केले. त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो. भारताची हार म्हणणारे पाकिस्तान जिंकला पाहिजे, अशी त्यांची आशा आहे का? असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला .

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.