AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : 35 आमदार फुटणार या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी कृतीमधूनच दिलं सूचक उत्तर

Eknath Shinde : महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, "आरोप-प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात.

Eknath Shinde : 35 आमदार फुटणार या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी कृतीमधूनच दिलं सूचक उत्तर
Eknath Shinde
| Updated on: Dec 01, 2025 | 1:09 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर आज छापा मारण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘चौकशी होईल, त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही’ असं सांगितलं. शहाजी बापू पाटील हे राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे खळबळ उडाली. शहाजी बापू पाटील यांनी भाजपा विरोधात भूमिका घेऊन सातत्याने टीका करण्याचा धडाका लावला होता.

एकाच हॉटेलमध्ये असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली नाही. त्यावर “मी अगोदर आलो होतो, मुख्यमंत्री नंतर आले. पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत. फोनवर आमची चर्चा होत असते. आमची चर्चा रोज चालू असते” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “आरोप-प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. डेव्हलपमेंटवर आमचा प्रचार सुरू आहे”

दुर्देवाने तशी घटना घडली आहे

काही ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाहीत. पण यावेळेस निवडणुका थांबवल्या गेल्या, त्यावर मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन” “निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कधीही निवडणूक अशा पद्धतीने थांबवल्या जात नाहीत. पण दुर्देवाने तशी घटना घडली आहे. त्याची मी माहिती घेतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

35 आमदार फुटणार असा दावा

संजय राऊत यांनी 35 आमदार फुटणार असा दावा केला, त्यावर एकनाथ शिंदे यांनी ‘हात जोडले आणि हसले, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो” एवढीच त्यांनी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे चिडले

पैठणमध्ये एकनाथ शिंदे एका सभेदरम्यान चिडले. एकनाथ शिंदे खासदार आणि कार्यकर्त्यावर चिडल्याचे पहायला मिळालं. भाषणाला उशीर होत असून लवकर भाषण घ्यावे यासाठी शिंदे चिडले. पैठण येथील प्रचार सभेसाठी एकनाथ शिंदे आले असता चिडल्याचं पहायला मिळालं. जलद भाषण करण्यासाठी केला आग्रह.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार