बाजारासाठी आईला दुकानावर पाठवून युवक काँग्रेस तालुकाध्यक्षाचा गळफास!

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर (वय 35) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सुरडकर यांनी गळफास घेण्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. सकाळच्या सुमारास सुरडकर यांनी त्यांच्या आईला किराणा दुकानात सामान आणायला पाठवले होते. मात्र त्यांची आई दुकानातून परत आल्यावर रमेश हे घरातील […]

बाजारासाठी आईला दुकानावर पाठवून युवक काँग्रेस तालुकाध्यक्षाचा गळफास!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर (वय 35) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सुरडकर यांनी गळफास घेण्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

सकाळच्या सुमारास सुरडकर यांनी त्यांच्या आईला किराणा दुकानात सामान आणायला पाठवले होते. मात्र त्यांची आई दुकानातून परत आल्यावर रमेश हे घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.

मुलगा लटकलेला दिसताच आईने हंबरडा फोडला, त्या आवाजाने शेजारी धावत आले. रमेश सुरडकर हे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांचे अतिशय निकटवर्तीय होते.

मनमिळावू स्वभाव असल्याने, विविध पक्षातील राजकीय व्यक्तींसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या आत्महत्येने गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून रमेश सुरडकर यांनी आत्महत्या का केली ?  याचा तपास पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.