संविधान संपवण्याचा भाजपचा गेम, आंबेडकरांच्या टीकेवरून मोदींनी फटकारलं; म्हणाले… तर तेव्हाच केलं असतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आहेत. त्यासाठीच त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधकांच्या या दाव्यावर बोलताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत फटकारलं आहे. बघा काय म्हणाले मोदी?

संविधान संपवण्याचा भाजपचा गेम, आंबेडकरांच्या टीकेवरून मोदींनी फटकारलं; म्हणाले... तर तेव्हाच केलं असतं
| Updated on: May 03, 2024 | 12:21 PM

संविधान बदलणार हे तर्क नाही आणि सत्यही नाही. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही. पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा… जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भाजप ४०० जागा जिंकली तर संविधान बदलणार असा सातत्याने विरोधकांकडून आरोप होत असताना मोदींनी यावर स्पष्टच विरोधकांना उत्तर दिलं. तर काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम एका कुटुंबाने केलं आहे. त्यांनी संविधानाच्या मर्यादा तोडल्या आहेत. मी त्याचं एक उदाहरण सांगतो. काँग्रेसने अधिकृतरित्या नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. ही काँग्रेसची नीती आहे, असा हल्लाबोल मोदींनी केला. दरम्यान, संविधान संपवण्याचा भाजपचा गेमप्लॅन असल्याची टीका प्रकाश आंबेजडकर यांनी केली होती. यासोबतच भाजपकडे ४०० जागा नव्हत्याच, ते आता २०० जागा ही पार जाणार नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.