जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; नितीशकुमार यांची मागणी

| Updated on: Oct 30, 2020 | 11:11 AM

प्रत्येक जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं, अशी आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या या मागणीला मतदार किती प्रतिसाद देतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; नितीशकुमार यांची मागणी
Follow us on

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळीही शिगेला पोहोचली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर थेट लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रत्येक जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं, अशी आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या या मागणीला मतदार किती प्रतिसाद देतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल. (cm nitish kumar demand reservation for tharu community)

वाल्मिकी नगरमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना नितीशकुमार यांनी ही मागणी केली आहे. जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. वाल्मिकी नगरमध्ये थारू जातीचे सर्वाधिक व्होट आहेत. अनुसूचित जनजातीमध्ये समाविष्ट करण्याची या जातीची खूप जुनी मागणी आहे. नितीशकुमार यांनी त्यांच्या या मागणीचं समर्थन केलं आहे. जातीनिहाय जनगणना करणं हे आपल्या हातात नाही. मात्र, जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं ही आपली मागणी असून त्यात कोणतंही दुमत नाही, असं नितीशकुमार म्हणाले.

थारू जातीला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत. वाजपेयींच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री असल्यापासून हा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षावर सडकून टीका केली. (cm nitish kumar demand reservation for tharu community)

संबंधित बातम्या:

VIDEO : ‘कुणाला कधी खाली पाडायचं, जनतेला चांगलं ठाऊक’, उमेदवाराच्या भाषणादरम्यानच स्टेज कोसळला

Bihar Election 2020: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान

(cm nitish kumar demand reservation for tharu community)