AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विसर्जनसाठी संकलन केलेल्या गणेशमूर्तींची छुप्या पद्धतीने विक्री, शिवसेनेचा आरोप

मूर्तीने संकलन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (Collection of Ganpati Idol Reselling at Dondaicha) 

विसर्जनसाठी संकलन केलेल्या गणेशमूर्तींची छुप्या पद्धतीने विक्री, शिवसेनेचा आरोप
फोटो प्रातनिधीक
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 05, 2020 | 9:46 PM
Share

धुळे : यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गणेशमूर्ती विसर्जन करु नये, यासाठी मूर्ती संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेने गणेशमूर्तींचे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (Collection of Ganpati Idol Reselling at Dondaicha)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपतीची प्रतिष्ठापनासाठी  नियम आणि अटी लागू करण्यात आले होते. तसेच विसर्जन मिरवणुकीला ध्वनिक्षेपक आणि जमावबंदीचा आदेश काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्यावतीने गणेशमूर्तींचे संकलन करण्यात येऊन त्याचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र दोंडाईचा नगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोंडाईचा शहरातही नगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्त्यांचे संकलन करण्यात आले होते. मात्र नगरपालिकेने या मूर्त्या विक्री केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. नाशिकहून आलेल्या एका ट्रकमध्ये गणपती भरले गेले, अशी माहिती शिवसैनिकांनी दिली आहे.

“दोंडाईचा नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपचे कार्यकर्ते उद्धवा मंदिराचे दार उघड असा नारा देत होते. मात्र दुसरीकडे हेच भाजपचे कार्यकर्ते गणेशमूर्तींची सर्रासपणे विटंबना करताना दिसून येतात”, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. (Collection of Ganpati Idol Reselling at Dondaicha)

संबंधित बातम्या : 

आधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्ग

वीजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा, आंघोळ घालून अंत्यसंस्कार

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा