वीजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा, आंघोळ घालून अंत्यसंस्कार

माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्याची ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढली आणि त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले

वीजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा, आंघोळ घालून अंत्यसंस्कार

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात एका माकडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला (Monkey Funeral At  Akkalkot). या माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्याची ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढली आणि त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले (Monkey Funeral At  Akkalkot).

जंगली किंवा पाळीव प्राण्यांबाबत आपल्यातील अनेक लोक खूपच भावूक असतात. प्राण्यांना एखादी जखम झाली, तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. अशीच एक मनाला स्पर्श करणारी घटना अक्कलकोट तालुक्यातील बाकरवाडी गावात घडली आहे.

अक्कलकोट पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ गुरुवारी (3 सप्टेंबर) दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका माकडाचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाला. खरीप पिकांच्या काढणीला वेग आल्यामुळे गावातील शेतकरी, मजूर लोक शेताकडे गेले होते. संध्याकाळच्या वेळेला सर्व गावकरी गावात येत होते, तेव्हा हा प्रकार त्यांच्या नजरेस आला (Monkey Funeral At  Akkalkot).

या प्रकाराने शेतकरी हळहळले. त्यांनी त्या मृत माकडाला ट्रॅक्टरमधून गावात आणले. त्यानंतर धार्मिक रिवाजानुसार त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले. त्याची पूजादेखील करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावभर अंत्ययात्रा काढण्यात आली. जसजशी अंत्ययात्रा पुढे जात होती, गावातील महिला त्या ट्रॅक्टरसमोर येऊन माकडाची ओवाळणी करत होत्या, अंत्ययात्रेत सहभागी होत होत्या. तर काही नागरिक ट्रॅक्टरच्या पुढे भजन गात होत्या.

ही अंत्ययात्रा गावातील हनुमान मंदिराजवळ येऊन थांबली. तिथे मंदिराच्या पायरीजवळ मोठा खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात रितीरिवाजानुसार माकडाचे अंत्यविधी करण्यात आले. गावखेड्यात आजही माकडाला मारुतीचे रुप समजले जाते, त्याचे हे जिवंत उदाहरण मानावे लागले.

Monkey Funeral At  Akkalkot

संबंधित बातम्या :

Corona Goddess Temple | कोंबडे-बकऱ्यांचा बळी, सोलापुरात चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *