AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण कुणाला नकोय?; ‘त्या’ नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं चंद्रकांतदादांना आव्हान

मराठा आरक्षण कुणला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे, असं आव्हानच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाटील यांना दिलं आहे.

मराठा आरक्षण कुणाला नकोय?; 'त्या' नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं चंद्रकांतदादांना आव्हान
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 21, 2020 | 7:13 PM
Share

मुंबई: मराठा समाजातील बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय असा दावा करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षण कुणाला नकोय? चंद्रकांतदादा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करा, असं आव्हानच अशोक चव्हाण यांनी पाटील यांना दिलं आहे. (ashok chavan on chandrakant patils maratha reservation statement)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मराठा आरक्षण कुणला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

बडे मराठा नेतेच आरक्षण विरोधी आहेत, हे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. गेली १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची क्लिअरकट सत्ता होती. मग मराठा समाजाला का नाही आरक्षण दिलं?, असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्यांच्या पुढे बॅकवर्ड हा शब्द लागेल. तेच मराठा नेत्यांना नको आहे. त्यांच्या मनात आपण फॉरवर्ड असल्याची भावना असून या भावनेला धक्का बसू नये असं त्यांना वाटतं. पण आता मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या नेत्यांनी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कपाटात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पाटील यांना हे आव्हान दिलं आहे.

दरम्यान, चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली. (ashok chavan on chandrakant patils maratha reservation statement)

यावेळी त्यांनी कृषीविधेयकावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होतं आहे. मध्यस्थांचा फायदा होतो आहे. याला काँग्रेसचा विरोधचं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रांतही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांचे हात मजबूत केले पाहिजेत,” असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण

संभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक

(ashok chavan on chandrakant patils maratha reservation statement)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...