मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan On Maratha Reservation)

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. अशातच मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. (Ashok Chavan’s vacate in Supreme Court on Maratha Reservation)

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

“आपण आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत” असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. “मराठा आरक्षणावर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. तसंच यावर लवकरात लवकर घटनापीठ स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतो आहोत”, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

अशोक चव्हाण-शरद पवार यांची भेट

तत्पूर्वी अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण तसेच राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुंबईतल्या वाय.बी.चव्हाण सेंटर येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. याच मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) माझी चर्चा झाली होती. याच चर्चेचा तपशील पवारांच्या कानावर घातल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसंच आरक्षणासंबंधी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर शरद पवारांशी चर्चा झाली. त्यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे यावेळी मांडले. एकंदरित आरक्षणासंबंधी पुढील रणनीतीविषयी चर्चा झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

अशोक चव्हाण यांचे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केला होता. त्यावर नेमक्या कोणत्या नेत्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावं, असे आव्हान अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी आसूड आंदोलन केले तर पंढरपुरात संबळ आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्याच्या इतरही भागात आरक्षणासाठी आज मराठा आंदोलकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

संबंधित बातम्या :

संभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक

(Ashok Chavan’s vacate in Supreme Court on Maratha Reservation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *