सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची अनिल अंबानींसाठी वकिली

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात एक खटला लढत आहेत. एकीकडे काँग्रेस राफेल प्रकरणावरुन अनिल अंबानींवर टीका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते सुप्रीम कोर्टात अनिल अंबानींना वाचवण्यासाठी लढत असल्याचं पाहून सोशल मीडियावर कपिल सिब्बल यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं. कपिल सिब्बल मंगळवारी सकाळी सुप्रीम […]

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची अनिल अंबानींसाठी वकिली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात एक खटला लढत आहेत. एकीकडे काँग्रेस राफेल प्रकरणावरुन अनिल अंबानींवर टीका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते सुप्रीम कोर्टात अनिल अंबानींना वाचवण्यासाठी लढत असल्याचं पाहून सोशल मीडियावर कपिल सिब्बल यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं.

कपिल सिब्बल मंगळवारी सकाळी सुप्रीम कोर्टात अनिल अंबानी यांच्या वतीने हजर होते. एरिक्सन इंडिया प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याचं हे प्रकरण आहे. एरिक्सनने थकीत पैशांप्रकरणी अनिल अंबानींविरोधात खटला दाखल केलाय. अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनने थकबाती दिल्याविनाच स्वतःला दिवाळखोर घोषित केलं, जे की सुप्रीम कोर्टाच्या नियमाविरोधात आहे, असा एरिक्सनचा दावा आहे.

मंगळवारी अनिल अंबानी स्वतः सुप्रीम कोर्टात हजर होते. सोबतच त्यांचे वकील कपिल सिब्बलही होते. यापूर्वीच कपिल सिब्बल यांनी राफेल प्रकरणावरुन अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सिब्बल यांनी ट्वीट केलं होतं, की “असं वाटतंय की एअरबस, फ्रान्स सरकार आणि अनिल अंबानी या सर्वांनाच माहित होतं, की पंतप्रधान मोदी 9-11 एप्रिल 2015 दरम्यान फ्रान्ससोबत एमओयू करणार आहेत.” ट्वीटसोबतच सिब्बल यांनी एक पत्रही सादर केलं होतं, जे कथितपणे युरोपियन कंपनी एअरबेसच्या अधिकाऱ्याने लिहिल्याचा दावा आहे. यामध्ये एका ईमेलचाही हवाला देण्यात आला होता, जो काँग्रेसने पुरावा म्हणून सादर केला आणि दावा केला की एमओयूबाबत अनिल अंबानी यांना अगोदरच माहिती होती.

एकीकडे अनिल अंबानी यांच्यावर टीका आणि सुप्रीम कोर्टात त्यांच्याच वतीने खटला लढणं यामुळे कपिल सिब्बल ट्रोल झाले. अनेक युझर्सने कपिल सिब्बल यांच्या दुहेरी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केलं. तर राफेल प्रकरणाच्या अगोदरपासूनच आपण अनिल अंबानींसाठी वकिली करत असल्याचं सिब्बल म्हणाले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.