या जिद्दी मुलीसमोर संकटानेही गुडघे टेकले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

भंडारा : वडिलांच्या पर्थिवाजवळ रात्रभर अभ्यास करून दहावीचा पेपर दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या खैरी पट येथे घडली. वडिलांचे पार्थिव घरी असूनही दहावीचा इंग्रजीचा पेपर देऊन मुलीने उच्चशिक्षण घेण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प प्रणाली मेश्राम हिने केला. अभ्यास करून पुढे जाण्याचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणाऱ्या वडिलांचे […]

या जिद्दी मुलीसमोर संकटानेही गुडघे टेकले
Follow us on

भंडारा : वडिलांच्या पर्थिवाजवळ रात्रभर अभ्यास करून दहावीचा पेपर दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या खैरी पट येथे घडली. वडिलांचे पार्थिव घरी असूनही दहावीचा इंग्रजीचा पेपर देऊन मुलीने उच्चशिक्षण घेण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प प्रणाली मेश्राम हिने केला.

अभ्यास करून पुढे जाण्याचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणाऱ्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. घरात वडिलांचे पार्थिव आणि उद्या दहावीचा पेपर अशा या परिस्थितीत प्रणाली हिने अभ्यास करून दहावीचा पेपर देण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यानंतर तिने वडिलांना अखेरचा निरोप दिला.

राज्य मार्ग परिवहन मंडळात चालक पदावर काम करणाऱ्या खेमराज मेश्राम हे नेहमी आपल्या मुलीला अभ्यासासाठी प्रेरित करीत असत. मुलीने शिकून आपल्या पायावर उभे राहावे असे त्यांना वाटत असे. अचानक खेमराज यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

प्रणालीने या कठीण परिस्थितीतही दहावीचा अभ्यास सुरू ठेवला. मात्र 4 मार्च रोजी खेमराज यांचे निधन झाले. मात्र प्रणाली हिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने दहावीचा पेपर देण्याचा निश्चय केला. रात्रभर वडिलांच्या पार्थिवाशेजारी बसून प्रणालीने अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर दिला आणि त्यानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करून उच्चशिक्षण घेणार असल्याचं प्रणालीने सांगितलं.