Food | दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ‘गोड’ रेसिपी!

| Updated on: Nov 09, 2020 | 6:34 PM

थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीचा (Diwali 2020) सण जवळ आला आहे.

Food | दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ‘गोड’ रेसिपी!
Follow us on

मुंबई : थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीचा (Diwali 2020) सण जवळ आला आहे. सणांचा माहोल आणि अशावेळी मिठाईची गोष्ट असणार नाही, असे होऊच शकत नाही. सणांच्या दिवसांत प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई अथवा गोड पदार्थ बनवले जातात. त्यातही दिवाळीत (Diwali) या मिठाईंना विशेष महत्त्व असते. यंदा कोरोनामुळे लोक बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळताना दिसत आहेत. अशावेळी बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा आपणा घरच्या घरी काही सोप्या मिठाई किंवा स्वीट डिश अर्थात गोड पदार्थ बनवू शकता (Diwali Special Kaju Barfi and boondi Ladoo recipe at home).

शिवाय बऱ्याच लोकांच्या घरी मधुमेह असणारे रुग्ण अथवा गोड पदार्थ, साखर न खाणाऱ्या व्यक्ती असतात. अशावेळी घराच्या घरी बनवलेल्या पदार्थात आपण साखरेला पर्यायी पदार्थ वापरू शकतो. बाहेरून आणलेल्या मिठाईमध्ये आपल्याला साखरेच्या प्रमाणाचा अंदाज लागत नाही. तसेच याकाळात घरात बनवलेले पदार्थच विश्वासार्ह असल्याने ‘हे’ गोड पदार्थ तुम्हीही नक्की ट्राय करू शकता.

काजू बर्फी (Kaju barfi)

काजू बर्फीला नाही म्हणणाऱ्या व्यक्ती निराळ्याच! आपल्यापैकी बहुतेक लोकांना काजूची बर्फी अर्थात काजू कत्री आवडते. दिवाळीसारख्या उत्सवाच्या दिवसांत कुठल्याही घरात काजू बर्फी सहज मिळतात. ही लोकप्रिय मिठाई आपणा आपल्या घरी सहजपणे बनवू शकता. काजू बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला केवळ काजू, दूध, साखर आणि वेलची या चार घटकांची आवश्यकता आहे (Diwali Special Kaju Barfi and boondi Ladoo recipe at home).

काजू बर्फी तयार करण्याची पद्धत :

प्रथम काजू आणि दुधाची एकत्र करून त्यांची बारीक पेस्ट बनवा. यानंतर या पेस्टमध्ये साखर घालून मंद आचेवर शिजवा. साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळा. मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत राहा आणि मिश्रण पिठासारखे दिसू लगून भांड्याची कडा सोडू लागले की त्यात वेलची पावडर मिसळून गॅसची आच बंद करा. एका ताटाला अथवा तत्सम भांड्याला तूप लावून त्या पात्रात हे मिश्रण काढून घ्या. व्यवस्थित पसरून, थंड होण्यासाठी ठेवून द्या. नीट सेट झाल्यावर त्यावर सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावून त्याच्या वड्या कापून घ्या आणि खाण्यास सर्व्ह करा.

 

बूंदीचे लाडू (Boondi Ladoo)

बूंदीचे लाडू बहुतेकदा विवाह आणि सणांमध्ये सर्वाधिक पसंत केले जातात. बूंदीच्या लाडूंचे नाव ऐकल्यावर तोंडाला पाणी येते. दुकानातील लाडू उत्तम असतातच पण, घरी बनवलेल्या बूंदीच्या लाडूंची चवच वेगळी असते (Diwali Special Kaju Barfi and boondi Ladoo recipe at home).

साहित्य : बेसन, दूध, तूप, पाणी, केशरी रंग, केशराच्या काड्या, काजू, मनुका, वेलची

बूंदीच्या लाडूची कृती :

बूंदीचे लाडू बनवण्यासाठी प्रथम बेसन पिठामध्ये पाणी किंवा दूध मिसळा आणि पातळ पेस्ट तयार करा. यानंतर कढईत तूप गरम करून, झाऱ्याच्या सहाय्याने बूंदी पाडून हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळा. बूंदी तुपात घोळवण्यापूर्वी पॅनमधून काढून कागदावर ठेवा.

यानंतर साखर आणि पाणी मिसळून पाक तयार करून घ्या. या पाकात केशर, सुकामेवा, वेलची आणि बूंदी मिसळा. 10 मिनिटानंतर या मिश्रणात थोडे कोमट पाणी घाला. यानंतर निदान 1 ½ तास हे मिश्रण झाकून ठेवा. यानंतर तळहातावर तूप लावून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. थोडावेळाने सेट झाले की सर्व्ह करण्यास एकदम तयार बूंदीचे लाडू!

(Diwali Special Kaju Barfi and boondi Ladoo recipe at home)