14 एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : जोगेंद्र कवाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिल रोजी 129 वी जयंती आहे. डॉ बाबासाहेब यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून केली (Jogendra kavade on Dr. Babasaheb Aambedkar) जाते.

14 एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : जोगेंद्र कवाडे
| Edited By: | Updated on: Apr 06, 2020 | 6:49 PM

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिल रोजी 129 वी जयंती आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून साजरी केली (Jogendra kavade on Dr. Babasaheb Aambedkar) जाते. मात्र, या वर्षीच्या जयंतीवर करोना वायरसचे सावट आहे. यामुळे यावर्षी जयंती साधेपणाने आणि प्रत्येकाने घरीच साजरी करावी, असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केलं (Jogendra kavade on Dr. Babasaheb Aambedkar) आहे.

जोगेंद्र कवाडे म्हणाले, “14 एप्रिल रोजी आपल्या घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र, सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करू नका. मी दरवर्षी जयंती निमित्त देशभर, राज्यभर फिरत असतो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे कुठेच जाणार नाही. मी ही माझ्या संपूर्ण परिवारासोबत येणाऱ्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोरोनाच्या महामारीमुळे घरीच साजरी करणार आहे. तुम्हीही करा, अशी विनंती करतो.”

याशिवाय प्रा. कवाडे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रंजना कवाडे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, सून प्रतिमा कवाडे, नातवंड निरजा आणि अस्मिता यांनी सर्वांनी घरीच, सुरक्षित रहा, सुरक्षित जयंती साजरी करा असं आवाहन केलं आहे.

देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.