AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेवर आणखी एक संकट, अलास्कामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका

अलास्कामध्ये सोमवारी 7.5 तीव्रतेचा हा भूकंप होता. ज्यानंतर शहरात त्सुनामीचा धोका देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेवर आणखी एक संकट, अलास्कामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका
| Edited By: | Updated on: Oct 20, 2020 | 8:16 AM
Share

जूनो : कोरोनाच्या संकटात आता अमेरिकेवर आणखी एक मोठं संकट आलं आहे. कारण, अमेरिकेच्या अलास्कामध्ये (Earthquake in Alaska)भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अलास्कामध्ये सोमवारी 7.5 तीव्रतेचा हा भूकंप होता. ज्यानंतर शहरात त्सुनामीचा धोका देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपाच्या वेळेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत जे अतिशय भयानक आहेत. (earthquake in alaska of 7.5 magnitude tsunami fears fleeing)

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला हादरा बसल्यानंतर आणखी दोन मोठे हादरे जाणवले. ज्याची तीव्रता 5 पेक्षाही जास्त होती. हा भूकंप जमिनीपासून 41 किमी खाली सँड पॉइंट शहरापासून 94 किमी दूर होता. नॅशनल ओशिऐनिक अँड वायुमंडलीय प्रशासन (NOAA) ने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचच्या सुमारास 7.4 तीव्रतेचे हादरे बसले, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

त्सुनामीच्या भीतीने लोकांनी घरं केली खाली अलास्का द्वीपकल्पाजवळ भूकंपावेळी (Earthquake in Alaska) लाट खूप उंचावर दिसल्या. ज्यामुळे लोक घाबरले आहेत. सध्या भूकंपामुळे काही भाग घरं खाली करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. अधिक माहितीनुसार, सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेलं नाही.

दरम्यान, अलास्कामध्ये बर्फ वितळत असून, यामुळे मोठ्या त्सुनामीचा धोका वाढत असल्याचा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी सोमवारी दिला. यावर्षी जुलैमध्ये अलास्कामध्ये एक मोठा भूकंप आला होता. त्याची तीव्रता 7.8 होती. त्यानंतरही त्सुनामीच्या हलकी लाटा आली होती. त्यामुळे आताही धोका असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या –

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

(earthquake in alaska of 7 5 magnitude tsunami fears fleeing)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.