मानुषी छिल्लरचे ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

या चित्रपटाची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. चित्रपटाची शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झाली आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित (Manushi chhillar new movie) होणार आहे.

मानुषी छिल्लरचे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
| Edited By: | Updated on: Jan 24, 2020 | 12:22 PM

मुंबई : या वर्षातील मोस्टअवेटेड चित्रपट ‘पृथ्वीराज’ आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार आणि माजी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi chhillar new movie)  दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. चित्रपटाची शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झाली आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित (Manushi chhillar new movie) होणार आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पृथ्वीराजच्या पत्नीच्या भूमिकेत मानुषी छिल्लर दिसणार आहे. चित्रपटाची पहिली झलक सध्या समोर आली आहे. मानुषीने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या भूमिकेचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटो हा तिच्या सावलीचा फोटो आहे.

हा चित्रपट एक ड्रामा आहे. तसेच राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून चौहान यांचा पराक्रम दाखवण्यात येणार आहे.

चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय मानव विज, आशुतोष राणा आणि सोनू सूदही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.