पोलिसांना फसवण्यासाठी जंगलात डमी पुतळे, नक्षलवाद्यांची शक्कल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

रायपूर : पोलीसांना जाळ्यात अडकवण्यासाठी नक्षलवाद्यांनी नवी शक्कल लढवली आहे. नक्षलवाद्यांचे भुजगावणे जंगलात लावून त्याखाली प्रेशरने ब्लास्ट होणारे विस्फोटं लावण्यात आले होते. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा आणि जागरगोंडा येथील जंगलातील ही घटना आहे. जंगलात पाच डमी नक्षलवाद्याचे पुतळे सापडले. यापूर्वी नक्षलवाद्यांनी अशी शक्कल कधीही वापरली नव्हती. आपला एकही सदस्य न गमवता पोलिसांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी […]

पोलिसांना फसवण्यासाठी जंगलात डमी पुतळे, नक्षलवाद्यांची शक्कल
Follow us on

रायपूर : पोलीसांना जाळ्यात अडकवण्यासाठी नक्षलवाद्यांनी नवी शक्कल लढवली आहे. नक्षलवाद्यांचे भुजगावणे जंगलात लावून त्याखाली प्रेशरने ब्लास्ट होणारे विस्फोटं लावण्यात आले होते. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा आणि जागरगोंडा येथील जंगलातील ही घटना आहे.

जंगलात पाच डमी नक्षलवाद्याचे पुतळे सापडले. यापूर्वी नक्षलवाद्यांनी अशी शक्कल कधीही वापरली नव्हती. आपला एकही सदस्य न गमवता पोलिसांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही नवी शक्कल लढवली आहे. पण पोलिसांनी नक्षलवाद्यांचा हा प्लॅन उधळून लावला.

छत्तीसगड आणि बाजूला महाराष्ट्रात गडचिरोली हा नक्षलप्रभावित भाग आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात अनेकदा चकमक होते. छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलाचे अनेक जवान विविध चकमकींमध्ये शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला यश येत असलं तरी नक्षलवादी आता विविध शक्कल लढवत आहेत.