माझा परिवार विकत घ्या, माझी शेती वाचवा, शेतकऱ्याची आर्त याचना

माझा परिवार विकत घ्या, माझी शेती वाचवा, शेतकऱ्याची आर्त याचना

सरकारकडून कर्जमाफी मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने (Farmers sale family washim district) आपले कुटुंब विक्रीला काढले आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Dec 21, 2019 | 4:38 PM

वाशिम : सरकारकडून कर्जमाफी मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने (Farmers sale family washim district) आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. माझा परिवार विकत घ्या मात्र माझी शेती वाचवा अशी आर्त याचना शेतकऱ्याने फलक लावून सरकारला केली आहे. विजय शेंडगे असं या शेतकऱ्याचे (Farmers sale family washim district) नाव आहे.

मागील तीन वर्षांपासून सततची नापिकी त्यामुळं शेतकरी हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार सांगितलं पण झाली नाही. आता नव्यानं महाविकास आघाडीचे सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देणार म्हणून सांगितलं होतं, मात्र अजून मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. तर अनेकांच्या डोक्यावर कर्ज वाढत चाललं आहे.

मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी पूत्र विजय शेंडगे यांच्या आजोबांच्या नावावर सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नसल्याने हातास होऊन शेती जगविण्यासाठी परिवार विक्रीला काढला आहे.

अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावं कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्री ला काढला आहे, असं शेतकरी पूत्र शेंडगे यांनी सांगितले.

दरम्यान, सततच्या नापिकीने कर्जबाजारीपणा वाढत असल्यामुळे जीवन जगणे असाह्य झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेल्याने प्रपंच्याचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळं सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें