पुण्यात धुळवडीदरम्यान दोन गटात राडा, गाड्यांंची तोडफोड आणि दगडफेक

पुण्यामध्ये धुळवड खेळताना दोन गटांमध्ये राडा झाला आहे (Fighting in Pune during Dhulvad). यात मोठ्या प्रमाणात गाड्याचीही तोडफोड करण्यात आली आहे.

पुण्यात धुळवडीदरम्यान दोन गटात राडा, गाड्यांंची तोडफोड आणि दगडफेक

पुणे : पुण्यामध्ये धुळवड खेळताना दोन गटांमध्ये राडा झाला आहे (Fighting in Pune during Dhulvad). यात मोठ्या प्रमाणात गाड्याचीही तोडफोड करण्यात आली आहे. चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पुण्यातील या राडेबाजीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यात एकमेकांचा पाठलाग करत दगडफेकही करण्यात आल्याचं दिसत आहे. चतुःशृंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

राडेबाजीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरुवातील एका गटातील काही तरुणांकडून दगडफेक होते. तसेच आजूबाजूच्या गाड्यांचीही तोडफोड होते. त्यानंतर समोरील गटाचे तरुणही लाठ्याकाठ्या घेऊन येतात. ते आधीच्या गटातील तरुणांचा पाठलाग करतानाही या सीसीटीव्हीत दिसत आहे.

या राडेबाजीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस याचा तपास करत आहेत.

मागील काही काळात पुण्यात काही गटांकडून दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर याचं मोठं आव्हान आहे. त्यातच आता धुळवडीच्या दिवशी देखील झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडूनही होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीसाठी बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच या राडेबाजीची घटना सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. या राडेबाजीने वातावरण आणखी तणावपूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेसह पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Fighting in Pune during Dhulvad

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI