विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) कार्यकर्त्यांनी विनापरवाना शोभा यात्रा काढत त्यात तलवारी आणि एअर रायफलचा उपयोग केल्याने त्यांच्याविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा यात्रेत सहभागी मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत फायरिंग केल्याने मोठा आवाज झाला होता. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट […]

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 10:56 AM

पुणे : विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) कार्यकर्त्यांनी विनापरवाना शोभा यात्रा काढत त्यात तलवारी आणि एअर रायफलचा उपयोग केल्याने त्यांच्याविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा यात्रेत सहभागी मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत फायरिंग केल्याने मोठा आवाज झाला होता.

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि त्यांच्या इतर 200 ते 250 कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.

यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभा यात्रा काढण्यात येत होती. रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 च्या दरम्यान सुरु असलेल्या शोभा यात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी 4 मुलींच्या हातात एअर रायफल होत्या. त्यांनी रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाज झाला. 5 मुलींच्या हातात तलवारी मिरवत असल्याचेही दिसून आले. याप्रकरणी निगडी पोलीस चौकशी करत आहेत.

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.