माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'
‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ‘पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली. आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही यांना जवळ केले कारखान्याला मदत केली. संस्थेला मदत केली. मी जे करतो ते मनाने करतो तुम्ही धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो. तुम्ही जनतेच्या मनातून मोदीजींना काढू शकत नाही’, असे म्हणत असताना ते पुढे असेही म्हणाले की, पवार साहेबांना जे जमलं नाही ते रणजीत सिंह निंबाळकरांनी दहा वर्षात करून दाखवलं म्हणून पवार साहेबांच्या तुमच्यावर राग आहे.’
Published on: Apr 29, 2024 12:11 PM
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
