व्हॅलेंटाईन डेलाच आर्चीज गॅलरी जळून खाक, लाखोच्या भेटवस्तू जळाल्या

व्हॅलेंटाईन डेलाच आर्चीज गॅलरी जळून खाक, लाखोच्या भेटवस्तू जळाल्या

नवी दिल्ली: मुंबईनंतर आता दिल्लीतही आगीच्या घटना वाढत आहेत. दिल्लीत गेल्या तीन दिवसांत सलग तिसऱ्यांदा आग लागली. आज सकाळी नारायणा फॅक्ट्री इथं भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 29 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावरुन आगीचं रौद्ररुप किती असेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला आला.

ज्या फॅक्ट्रीत ही आग लागली आहे ती आर्चीज फॅक्ट्री आहे. भेटवस्तू किंवा गिफ्टसाठी आर्चीज गॅलरी प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त तर आर्चीज गॅलरीमध्ये सर्वाधिक गर्दी होते. मात्र आजच्याच दिवशी या गॅलरीला भीषण आग लागली. या आगीत आर्चीज गॅलरी जळून खाक झाली.

त्याआधी मंगळवारी करोलबाग इथल्या अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी दिल्लीतील पश्चिमपुरी परिसरात आगीमुळे 250 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे शेकडो कुटुंबं बेघर झाली.

Published On - 11:11 am, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI