आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला

| Updated on: Sep 09, 2019 | 9:19 PM

समाजासाठी आदर्श ठरेल असं उदाहरण (mother in law in beed) बीड जिल्ह्यात समोर आलंय. निधन झालेल्या सासूला खांदा देऊन या सुनांनी नवा आदर्श उभा केलाय.

आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला
Follow us on

बीड : सासू आणि सूनेचा वाद (mother in law in beed) काही नवीन नाही. क्षुल्लक कारणावरून सासूला घराबाहेर हकलणाऱ्या बहाद्दर सुनांचा कारनामा सर्वांना माहितच आहे. मात्र समाजासाठी आदर्श ठरेल असं उदाहरण (mother in law in beed) बीड जिल्ह्यात समोर आलंय. निधन झालेल्या सासूला खांदा देऊन या सुनांनी नवा आदर्श उभा केलाय.

गणेशोत्सव काळातच सासूचं अचानक निधन झालं. आईसमान वागवलेल्या सासूचं निधन झालं आणि या सुनांना धक्काच बसला. याचं दुःख अनावर झालं आणि सुनांनी चक्क सासूला खांदा देण्याचा संकल्प केला. सुनांनी सासूला खांदा देत अंत्यविधीला सुरुवात केली.

बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.

पाहा व्हिडीओ :