हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी फार मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हार्दिकच्या वडिलांची इच्छा होती की, हार्दिकचं लग्न ‘उमिया […]

हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी फार मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

हार्दिकच्या वडिलांची इच्छा होती की, हार्दिकचं लग्न ‘उमिया धाम’ येथे व्हावं. देवी उमियाने पाटीदारांच्या सत्तेच्या काळात हे मंदिर बनवलं होतं. मात्र, इथे हार्दिकचं लग्न होणं शक्य नाव्हतं, कारण उंझामध्ये हार्दिकला प्रवेशास कोर्टाने मनाई केली आहे, त्यामुळे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील हार्दिक पटेलच्या कुलदेवतेच्या मंदिरात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी हार्दिक आणि किंजलच्या जवळच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने या विवाहाला हजेरी लावली.

हार्दिकची पत्नी किंजल पटेल ही सुरत येथील आहे. हार्दिकपेक्षा किंजल दोन वर्षांनी लहान आहे. किंजल ही पारिख-पटेल समाजातील असून, तिने वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. किंजल सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे. हार्दिक आणि किंजल हे सहावी ते बारावी एकत्र शिकले आहेत. किंजल आणि हार्दिकची बहीण मोनिका यांच्यात चांगली मैत्री आहे, त्यामुळे तिचे आधीपासूनच हार्दिकच्या घरी येणं-जाणं होतं. हार्दिक आणि किंजल या दोघांचेही कुटुंब चंदननगरी या गावात राहात होते.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.