AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाल आपलाच… निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले

देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील पाचव्या टप्प्याची निवडणूक येत्या 20 मे रोजी होणार आहे. 20 मे रोजी देशातील एकूण 49 जागांवर मतदान होणार आहे. त्यातील महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वीच भोर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गुलाल आपलाच... निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले
Supriya SuleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 5:27 PM

लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पाच सुरू आहे. सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच लागले सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता निवडून येणार असल्याचं वाटत आहे.

एकीकडे 4 जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असणार? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे – सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे.

गड कोण राखणार?

देशातील लोकसभा निवडणुका सुरु आहेत. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे. येत्या 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 4 जून रोजी नक्की काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली आहे. त्यात नक्की कोण बाजी मारणार? बारामतीचा गड कोण काबीज करणार? याची उत्सुकता नागरीकांना लागून राहिली आहे. बारामतीत कोण आणि कसे विजयी होणार, याचे अंदाज लावले जात आहेत. पारावार, चौकात, हॉटेलात, शेतात सर्वत्र हीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

कोण म्हणतं येत नाय…

पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता.भोर) गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांनी चक्क सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांनी सुप्रिया सुळे यांचं अभिनंदनही केलं आहे. “मा. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.” “गुलाल आपलाच”, “विजय निश्चित”… “कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय”, या मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरुन प्रवास करताना हे फलक प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणूक लागली तेव्हापासूनच सुप्रिया सुळे यांचा विजय होणार असल्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विजयाचे फलक लावले आहेत, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.