पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पतीकडून शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने थेट शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Husband attack on neighbour)  केला.

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पतीकडून शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला
| Edited By: | Updated on: Feb 14, 2020 | 11:15 PM

ठाणे : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने थेट शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Husband attack on neighbour)  केला. ही घटना बुधवारी (12 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ठाणे वसंतविहार परिसरात घडली. भरत सिंग राजपुरोहित असं जखमी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी शिवाजी कुरणे याला पोलिसांनी (Husband attack on neighbour) अटक केली आहे.

जखमी भरत सिगं राजपुरोहित हा एकटाच ठाणे येथे राहतो. त्याचे कुटुंबीय मुळगावी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात राहतात. राजपुरोहित याच्या घरी स्वयंपाक आणि घरकामासाठी शिवाजी कुरणे याची पत्नी सकाळी आणि रात्री येत असे. यावरुन शिवाजी आपल्या पत्नीवर संशय घेत होता.

शिवाजीला संशय आल्याने त्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) सकाळी राजपुरोहित याला फोनवरुन धमकावले होते. त्यानंतर बुधवारी राजपुरोहित मुंबईला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता. यावेळी शिवाजीने अचानक पाठीमागून येऊन कोयत्याने राजपुरोहितवर जीवघेणा हल्ला केला. असा जबाब राजपुरोहित याने पोलिसांना दिला असून याप्रकरणी चितळसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.