‘सीए’ना कोरोना झाल्यास आर्थिक मदत, ICAI चा मोठा निर्णय

कोरोना काळात ऑडिटिंगसह इतर कामं करताना 'सीए'ना कोरोनाची लागण झाली तर त्यांना दीड लाख रुपयांची मदत (Chartered Accountant Pune) करणार

'सीए'ना कोरोना झाल्यास आर्थिक मदत, ICAI चा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 8:37 AM

पुणे : कोरोना काळात ‘सीए’ना ऑडिटिंगसह इतर कामांसाठी बाहेर फिरावे लागते. या दरम्यान जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना दीड लाख रुपयांची मदत (Chartered Accountant Pune) करणार, असा निर्णय द इन्स्टि्यूट ऑफ चार्टर अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. ही मदत आयसीएआय’ चार्टर्ड अकाऊटंट बनेव्हलंट फंडातून (CABF) केली जाणार आहे (Chartered Accountant Pune).

लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. पण ‘कोरोना’मुळे धोका टळलेला नाही. अशा स्थितीत ‘सीए’ना बँका, कंपन्यांचे कार्यालये, मोठ्या संस्था यासह अन्य ठिकाणी कामासाठी जावे लागते. अनेकांशी भेटी होतात.

सोशल डिस्टन्स राखला तरी धोका पूर्णपणे टळलेला नसतो. याचा विचार करून ‘आयसीएआय’ने चार्टर्ड अकाऊंटंट बनेव्हलंट फंडातून (सीएबीएफ) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

‘सीए’ना कोरोनाची लागण झाल्यास ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अहवालासह इतर कागदपत्र सादर करावे लागतील. हा निधी फक्त कोरोना उपचारासाठीच वापरावा लागणार आहे. त्याचा वापर न झाल्यास हा निधी परत करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी https://cabf.icai.org या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

नुकतेच पुणे महापालिकेनेही शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाल्यास त्यांना संरक्षण म्हणून पन्नास लाखांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचा विचार महापालिकेने केला आहे. तसेच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यास उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेतर्फे करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कोरोनाविरोधी लढाईत योगदान देणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्स, फॅमिली डॉक्‍टरांना विमा कवच आणि उपचाराची हमी मिळणार आहे. या विम्याचे हप्ते (प्रीमियम) महापालिकेतर्फे भरले जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक टेस्ट, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 3 जम्बो रुग्णालयं उभारणार : नवल किशोर राम

Pune Corona | 31 जुलैपर्यंत पुण्यात 60 हजार कोरोना रुग्ण असतील, अतिरिक्त आयुक्तांची माहिती

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.