पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. […]

पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे पाच सैनिक मारले आहेत. यासोबतच पाकिस्तानच्या पाच चैक्या उडवल्या आहेत.

बालाकोट, चकोटसह 13 दहशतवादी तळावर एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर शस्त्रसंधीच उल्लंघन मंगळवारी रात्रीपासून आणि बुधवारी सकाळीही करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून मनजोत पुंछ, नौशेरा राजौरी, अखनूर आणि सियालकोट सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे. भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक होत टँकचा वापर केला.

पाकिस्तानच्या पाच चौक्या भारतीय जवानांनी उडवून लावल्या आहेत. यामुळे पाकिस्तान आणखी आक्रमक होत सतत गोळीबार करत आहे. यामध्ये पाकिस्तानचे पाच सैन्यही मारले गेले आहेत, तर काहीजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गोळीबार सुरु असल्याने सीमेरेषेपासून पाच किमी अतंरावर असलेल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच पाचवी ते सातवी पर्यंतची परीक्षाही रद्द करण्यात आल आहे.

पंजाबमध्ये तणाव

पंजाब येथील भारतीय सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सीमारेषेचा दौरा करणार आहेत. सीमा रेषेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.